Posts

Showing posts from August, 2015

थियटरमधील थरार! (सत्यघटना)

मला मराठी फिल्म्स थियटर मध्ये जाऊन पाहण्याची सवय आहे, सर्वच नाही पण निवडक सिनेमे मी हमखास पाहतो. असो. या सवयीप्रमाणे मी १४ ऑगस्टला कांजुरमार्गच्या हुमा थियटर मध्ये मित्रासोबत त्याच दिवशी प्रदर्शित झालेला "डबल सीट" सिनेमा पाहायला गेलो होतो. आणि थियटर हाउसफुल होत. सरकारी नियमाप्रमाणे सिनेमा सुरु होण्याआधी राष्ट्रगीत लागत. थियटर नुसार वेगवेगळ्या थीमची राष्ट्रगीत सादर केली जातात. ह्यावेळी राष्ट्रगीताची थीम होती "सामान्य भारतीयाला समर्पित राष्ट्रगान". खूपच सुंदर सादरीकरण असल्याकारणान सार थियटर मंत्रमुग्ध होऊन शांतपणे उभे राहून पाहत होत. राष्ट्रगीत संपल आणि जोरात एक आवाज एकू आला. तो सवयीप्रमाणे "भारतमाता कि जय!" वैगेरे नव्हता. तो होता "कोण आहे तो पुढे बसलेला?? तो अपंग आहे का?? उठवा त्याला." तावतावने एक मध्यम वयाची स्त्री ओरडत होती. तिचा ह्या विचारण्याने आम्हा सर्वांच लक्ष त्याच्याकडे गेल, तो मुलगा पायावर पाय टाकून निवांत मोबाईल मधले फोटो पाहत बसला होता. त्याला त्या बोलण्याच सोयरसुतक नव्हतं. त्या स्त्रीच्या ओरडण्याने बर्याच लोकांच्या कं