Posts

Showing posts from November, 2015

"कट्यार काळजात घुसली" च्या निमीत्ताने

Image
सामान्य रसिक आणि शास्त्रीय संगीताचा रसिक यां मध्ये नाही म्हंटलतरी एक प्रकारची जातीयता समाजात पाहायला मिळते. शास्त्रीय संगीत ऐकणारे म्हणजे खूप बुद्धिवान, दर्दी रसिक आणि सधन अशा विशेषणाने संबोधले जातात. परंतु पुलंनी सांगितल्याप्रमाणे काही लोक अशा शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात चक्क झोपदेखील काढतात आणि अगदी अशाच प्रकारचा अनुभव अच्युत गोडबोले यांनीही त्यांच्या "नादवेध" या पुस्तकात नमूद केला आहे. याचाच अर्थ असे काही लोक संगीताचा आस्वाद घ्यायला नव्हे तर वर नमूद केलेली विशेषणे आपल्यासमोर लागावी म्हणून अशा कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. माझ्यामते तर शास्त्रीय संगीताचा आनंद घेण्यासाठी त्याचे बारकावे, राग किंवा त्याचा इतिहास माहित असण्याची अजिबात गरज नसते. जे मनाला भिडेल ते संगीत आपल होऊन जात असत आणि मग त्याचा राग वैगेरे या गोष्टी गौण असतात. पंडित भीमसेन जोशींच "तीर्थ विठ्ठल" हे गाण कुणाला आवडत नाही? नुकतच माझ्या वाचनात आल कि या गाण्याला विविध रागांचा साज चढवण्यात आलाय. पण या गोष्टी माहित नसतानाही लोकांना ते आवडलं त्याच एक कारण म्हणजे अनमोल अस हे गाणं रसिकां