Posts

रात्री थंडी कोठुन येते?

Image
हे कोडं सोडवण्याआधी थोडी शास्त्रीय माहिती जाणून घेऊ. "प्लॅन्क" नावाच्या शास्त्रज्ञाने औष्णिक किरणोत्सार (Thermal Radiation) विभागात मोठं काम करून ठेवलं आहे. त्याने एखाद्या वस्तूच्या तापमानावरून ती वस्तू किती औष्णिक किरणोत्सार (जो कि इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग (electromagnetic waves) स्वरूपात असतो) करते याच सूत्र मांडलं. त्याला प्लॅन्क चा नियम असे म्हणतात. आणि सांगितलं कि प्रत्येक पदार्थ जो -२७३ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाचा आहे तो अनंत म्हणजे सर्वच तरंग लांबीचा औष्णिक किरणोत्सार अविरतपणे करतो. आणि सर्वात जास्त औष्णिक किरणोत्सार करणारी तरंगलांबी हि त्या तापमानावर अवलंबून असते जे कि "विन" या शास्त्रज्ञाने सूत्रासहित दाखवून दिलं.   आता या सर्व गोष्टींचा साधा सोपा अर्थ काय ते पाहू. १. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी आणि आपले शरीरही -२७३ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाचे असल्याने आपण कायम इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांचा औष्णिक किरणोत्सार करतो आणि ते होत असलेल्या भोवतालात वावरतो. २. ह्या किरणोत्साराने पदार्थाचे तापमान कमी कमी होत जाते, पण जर प...

हवामान बदलाचे परिणाम

Image
हवामान बदल हा कोणी मानो अथवा न मानो, त्याच्या होणाऱ्या परिणामांपासून कोणीही वाचू शकत नाही हे सत्य आहे. हवामान बदलाचे मूळ कारण म्हणजे वातावरणात असणाऱ्या वायूंच्या प्रमाणात झालेला बदल. झालयं असं कि मुख्यत्वे कार्बन डायऑक्साइड वायूचं प्रमाण हे विविध कारणांनी वाढू लागलयं आणि याचा परिणाम लॉन्ग वेव्ह रेडिएशन शोषणावर होऊन पृथ्वीवरील तापमान वाढू लागलयं. आता बरेच लोक असं मानतात कि हवामान बदल वैगरे खोटे आहे, कारण त्यांच्यावर त्याचा थेट परिणाम झालेला नसतो. परंतु पृथ्वीवरील वातावरण आणि पृष्ठभाग हा प्रत्येक ठिकाणी सारखा नसल्याने हवामान बदलाचे परिणाम सर्व ठिकाणी सारखे दिसणार नाहीत. हवामान बदलाच्या परिणामाचे मोजमाप करण्यासाठी Germanwatch observatory एक Global Climate Risk Index (जागतिक हवामान धोका निर्देशांक) नावाचं परिमाण वापरते. Global Climate Risk Index हे हवामान-संबंधित नुकसानीच्या घटनां (वादळ, पूर, उष्णतेच्या लाटा इ.) च्या प्रभावामुळे तो देश किती प्रमाणात प्रभावित झाला आहे याचं विश्लेषण करते. यामध्ये मुख्यत्वेकरून जीवित आणि वित्त हानी यांचा समावेश केला जातो. या मूल्यमापनानुसार ...

चक्रीवादळ आणि कारणे

Image
आजकल वारंवार येणाऱ्या चक्रीवादळांमुळे किंवा त्याचे थेट परिणाम भोगल्यामुळे आपल्या मनात ते समजून घेण्याची जिज्ञासा निर्माण होणे स्वाभाविक आहे. अगदी मोजक्या शब्दांत या प्रश्नाचे सर्वांगाने उत्तर देणे तसे अवघड आहे कारण हे सांगताना बऱ्याच तांत्रिक संज्ञा समजून घ्याव्या लागतील. तरीही मी जरा सोप्या भाषेत ते देण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम आपण खालील काही बाबी समजावून घेऊ: १. हवेचा प्रवाह हा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतो. उदाहरणार्थ, हवा भरलेल्या टायरला छिद्र पडल्यास त्यातील हवा बाहेर येते कारण टायर मधल्या हवेचा दाब हा वातावरणातील हवेच्या दाबापेक्षा जास्त असतो. २. पाण्याची वाफ हि हवेपेक्षा हलकी असल्यामुळे तीचा प्रवाह कायम वर जाताना दिसतो. उदाहरणार्थ, गरम पाण्यातील वाफ कायम वर जाते. ३. गरम हवा हि थंड हवेपेक्षा हलकी असल्याने तीचा प्रवाह कायम वर जाताना दिसतो. उदाहरणार्थ, पत्र्याच्या घरात उन्हाळ्यात माळ्यावर जास्त गरम लागते. ४. पृथ्वी स्थिर नसल्याने म्हणजेच ती स्वतःभोवती फिरत असल्याने हवेचा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे होणार प्रवाह सरळ रेषेत नसून वळणदार असतो. ह्या वळणाची ...

घराबाहेर पडलो कि . . . .

Image
एकदा घरापासून लांब राहील कि आपल्याला घराची आठवण येतेच पण ज्यासाठी आपण बाहेर पडलो ती जबाबदारी सुद्धा मनात घर करून असते. काही दिवसांनी आपण आपल्या कामात आणि नव्या जागेत रुळू लागतो आणि आपलं एक नवीन जग तयार व्हायला सुरुवात होते. हे जग म्हणेज आपला मित्रपरिवार, शिक्षणसंस्था/नोकरीचे ठिकाण आणि आजूबाजूचा परिसर यांनी बनलेल असतं. घरापासून लांब राहिल्याने एक मोठा बदल निर्माण होतो. तो म्हणजे आपण दोन चेहरे घेऊन वावरायला लागतो. एक चेहरा आपल्या जमिनीशी नाळ सांगणारा आणि दुसरा आपल्या व्यावहारिक जीवनातला.   आपण घर सोडलं त्यावेळी आपल्या आजूबाजूच्या सर्वच लोकांची आपल्या मनात एक वेगळी छाप पडलेली असते. परंतु आपण घरी नसताना या माणसांमध्ये पण विलक्षण बदल झालेले असतात हे आपण साफ विसरून जातो आणि जुन्या संदर्भाने सर्व पाहतो. मग आपण अधून मधून घरी आलो कि लोकांबरोबर जुन्या पद्धतीने वागण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जिथं ते नातं सोडलं तिथून पुढे नेण्याचा प्रयत्न करतो पण ते सर्व आपल्यासारखे पुढे निघून गेलेले असतात हे आपण समजून घेत नाही. ह्याच कारणाने आपण पुढे गेलो असलो तरी घराकडील माणसांसाठ...

मॉन्सून या शब्दाचे मूळ काय?

Image
मान्सून हे नाव अरबी/हिंदी भाषेतील "मौसम" म्हणजेच मराठीतील ऋतू ह्या शब्दावरून आलेले आहे. ह्या शब्दाचा वापर अरब व्यापाऱ्याकडून करण्यात आला असं मानलं जात. जुन ते सप्टेंबर या काळात अरबी समुद्रात वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशा आणि गतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतो आणि समुद्रालगत वारे नैऋत्य दिशेने वाहू लागतात आणि त्यामुळे भारतात पाऊस पडतो. हा बदल मोठा आणि दीर्घकाळ टिकणारा असल्याने व्यापाऱ्यांसाठी (जे पूर्वी मालवाहतुकीसाठी शिडाची जहाजे वापरत) महत्वाचा होता आणि त्यांच्या व्यावहारिक बोलण्यामधूनच मान्सून हा शब्द उदयास आला असे मानतात. मान्सून मध्ये वाहणाऱ्या वाऱ्याचा संपूर्ण प्रवास पाहिल्यास तो जास्तीत जास्त समुद्रावरून होत असल्याचे आपल्या लक्षात येईल. हे वारे समुद्रावरून वाहत असल्याने आपल्यासोबत लक्षणीय प्रमाणात बाष्प घेऊन येतात आणि त्यामुळे ढग बनून पाऊस पडायला मदत होते. एक महत्वपूर्ण माहिती: मानवाने जेव्हापासून पावसाची नोंद करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून मान्सून हा नियमितपणे दरवर्षी येत आहे. यामध्ये खंड पडल्याची नोंद अजूनतरी मिळालेली नाही. परंतु तो जरी नियमित होत अस...

असा चित्रपट जो मला आवडत नाही पण जवळजवळ प्रत्येकाला आवडतो

Image
 3 idiots हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय असल्याने थोडं आश्चर्य वाटू शकत. मला हा चित्रपट आवडत नसला तरी तो अतिशय टुकार आणि टाकाऊ आहे असेही वाटत नाही. काही स्पष्टीकरण देण्याआधी मी अनुभवलेला एक प्रसंग इथे सांगावासा वाटतो.   मी NITK मध्ये M. Tech करत असताना दुसऱ्या वर्षाला एका नावाजलेल्या प्राध्यापकांबरोबर प्रोजेक्टच काम करत होतो. ते प्राध्यापक कडक शिस्तीचे पण शांत आणि मृदू स्वभावाचे होते. दुसऱ्या वर्षी केवळ प्रोजेक्ट आणि प्रबंध यांचं काम असल्यामुळे आम्ही पूर्णवेळ लॅब मध्ये काम करत असू. हेच प्राध्यापक बॅचलर्सच्या मुलांनाही शिकवत असत आणि विशेष म्हणजे त्यावर्षी एका संपूर्ण बॅचचे पालकत्व त्यांना दिल गेलं होत. पालकत्व म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एका प्राध्यापकाची नेमणूक दरवर्षी होत असते आणि संस्थाही त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांशी संपर्क साधत असते. एकेदिवशी लॅबमध्ये काम करत असताना एक पालक आमच्याकडे प्राध्यापकांविषयी चौकशी करू लागले. ते हिंदीत बोलत असल्याने बाकीच्यांनी मला पुढं केलं कारण त्यांना एकतर त्यांची मातृभाषा किंवा इंग्रजी कळायचं. मग मी त्यांना एका खोलीपर्यंत घेऊन ग...

पंढरीची वारी

Image

"घेई छंद" पुस्तकानुभव

Image
लेखक: सुबोध भावे प्रकाशक: रसिक आन्तरभारती अगदी लहानपणापासून चित्रपट हे मनोरंजनच माध्यम म्हणून समोर असल्याने अर्थातच जवळजवळ सर्वांनाच चित्रपट क्षेत्र आणि त्याची निर्मिती ह्याबद्दल जाणून घ्यायची खूप उत्सुकता असते. बऱ्याच वेळा याच उत्सुकतेपोटी आपण एखादं चित्रपट विषयक मासिक किंवा लेख किंवा मुलाखती वाचत किंवा ऐकत असतो. पण ह्या गोष्टी सांगताना खूपदा वास्तव बाजूला सारून ती माहिती खप व ण्यासाठी मसालेदार पद्धतीने मांडली जाते आणि मग सत्य हरवून बसत. हे टाळण्यासाठी एकतर चित्रपट सृष्टीतील एखाद्या व्यक्तीचं आत्मचरित्र किंवा चरित्रवर्णन वाचणं हा सोपा मार्ग आहे. हे लक्षात घेऊन मी मागे "एकटा जीव" हे पुस्तक वाचलं आणि मला ते आवडलही. परंतु एखाद्या मराठी चित्रपटाची निर्मिती किंवा त्याची जन्मकथा सांगणार पुस्तक मात्र मला सापडलं नव्हतं. असंच एकदा ट्विटरवर सुबोध भावेचं एक ट्विट दिसलं आणि मी अधीर झालो. त्याने त्यात त्याच्या पहिल्या वाहिल्या पुस्तकाबद्दल सांगितलं होत आणि ते पुस्तक त्याच्या १ नाटक आणि ३ चित्रपटांच्या निर्मितिप्रवासाबद्दल होत. मी लागलीच फोन करून एक प्रत बुक केली.  अर्...

"कट्यार काळजात घुसली" च्या निमीत्ताने

Image
सामान्य रसिक आणि शास्त्रीय संगीताचा रसिक यां मध्ये नाही म्हंटलतरी एक प्रकारची जातीयता समाजात पाहायला मिळते. शास्त्रीय संगीत ऐकणारे म्हणजे खूप बुद्धिवान, दर्दी रसिक आणि सधन अशा विशेषणाने संबोधले जातात. परंतु पुलंनी सांगितल्याप्रमाणे काही लोक अशा शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात चक्क झोपदेखील काढतात आणि अगदी अशाच प्रकारचा अनुभव अच्युत गोडबोले यांनीही त्यांच्या "नादवेध" या पुस्तकात नमूद केला आहे. याचाच अर्थ असे काही लोक संगीताचा आस्वाद घ्यायला नव्हे तर वर नमूद केलेली विशेषणे आपल्यासमोर लागावी म्हणून अशा कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. माझ्यामते तर शास्त्रीय संगीताचा आनंद घेण्यासाठी त्याचे बारकावे, राग किंवा त्याचा इतिहास माहित असण्याची अजिबात गरज नसते. जे मनाला भिडेल ते संगीत आपल होऊन जात असत आणि मग त्याचा राग वैगेरे या गोष्टी गौण असतात. पंडित भीमसेन जोशींच "तीर्थ विठ्ठल" हे गाण कुणाला आवडत नाही? नुकतच माझ्या वाचनात आल कि या गाण्याला विविध रागांचा साज चढवण्यात आलाय. पण या गोष्टी माहित नसतानाही लोकांना ते आवडलं त्याच एक कारण म्हणजे अनमोल अस हे गाणं रसिकां...

थियटरमधील थरार! (सत्यघटना)

मला मराठी फिल्म्स थियटर मध्ये जाऊन पाहण्याची सवय आहे, सर्वच नाही पण निवडक सिनेमे मी हमखास पाहतो. असो. या सवयीप्रमाणे मी १४ ऑगस्टला कांजुरमार्गच्या हुमा थियटर मध्ये मित्रासोबत त्याच दिवशी प्रदर्शित झालेला "डबल सीट" सिनेमा पाहायला गेलो होतो. आणि थियटर हाउसफुल होत. सरकारी नियमाप्रमाणे सिनेमा सुरु होण्याआधी राष्ट्रगीत लागत. थियटर नुसार वेगवेगळ्या थीमची राष्ट्रगीत सादर केली जातात. ह्यावेळी राष्ट्रगीताची थीम होती "सामान्य भारतीयाला समर्पित राष्ट्रगान". खूपच सुंदर सादरीकरण असल्याकारणान सार थियटर मंत्रमुग्ध होऊन शांतपणे उभे राहून पाहत होत. राष्ट्रगीत संपल आणि जोरात एक आवाज एकू आला. तो सवयीप्रमाणे "भारतमाता कि जय!" वैगेरे नव्हता. तो होता "कोण आहे तो पुढे बसलेला?? तो अपंग आहे का?? उठवा त्याला." तावतावने एक मध्यम वयाची स्त्री ओरडत होती. तिचा ह्या विचारण्याने आम्हा सर्वांच लक्ष त्याच्याकडे गेल, तो मुलगा पायावर पाय टाकून निवांत मोबाईल मधले फोटो पाहत बसला होता. त्याला त्या बोलण्याच सोयरसुतक नव्हतं. त्या स्त्रीच्या ओरडण्याने बर्याच लोकांच्या कं...

दादा कोंडके - "एकटा जीव" पुस्तकानुभव

Image
पुस्तकाचे मुखपृष्ठ पुस्तक: "एकटा जीव"           लेखक: दादा कोंडके   शब्दांकन: अनिता पाध्ये   प्रकाशक: अनुबंध प्रकाशन   ISBN10: 8186144994 सिनेकलाकारांची दुनिया आपल्याला कायमच रंगीबेरंगी वाटत आली आहे. त्यां चा थाटमाट आणि त्यांना मिळणारा मान सन्मान पाहून आपल्याला त्यांच्या जगण्याचा हेवा वाटत नसेल तरच नवल. प्रसारमाध्यम सोडली तर त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेण्याची फारशी संधी आपल्याला मिळत नाही. प्रसारमाध्यमही त्यांना सोयीस्कर अशाच बातम्या आपल्याला पुरवत असतात त्यामुळे त्यांच्या विश्वासहर्तेवरही प्रश्नचिन्ह उभे राहते. मग पडद्यामागील गोष्टी समजून घेण्यासाठी दोनच पर्याय उपलब्ध असतात एक म्हणजे त्या कलाकाराशी केलेली प्रत्यक्ष बातचीत किंवा त्याने प्रामाणिकपणे लिहिलेलं आत्मचरित्र. पहिला पर्याय स्वीकारणं सर्वांना शक्य होतच असं नाही, पण दुसरा पर्याय हा सर्वांना स्वीकाराण्याजोगा आहे आणि ह्या दुसर्या पर्यायाचे वैशिष्ट्य म्हणजे ते लिहिणारी व्यक्ती हयात असो वा नसो आपल्...

मला आवडलेला चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो (Dr. Prakash Baba Amte- The real Hero)

Image
चित्रपटाचे पोस्टर मराठी भाषेत सध्या अनेक दर्जेदार चित्रपट बनत आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे "डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो". सामजिक विषयावर भाष्य करणारे मराठीमध्ये आजवर अनेक चित्रपट बनले आहेत. पण हा चित्रपट  त्यापासून निश्चितच वेगळा वाटतो कारण हा एक जीवनपट आहे. विविध प्रसंगांमधून हा चित्रपट समाजसेवेसाठी आयुष्य वेचलेल्या डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे या जोडीचा खडतर प्रवास दाखवतो. "मी समाजसेवा करते/करतो" या वाक्याचा उच्चार उच्चभू मंडळी सातत्याने करताना दिसतात. खरतर गरजूंपर्यंत त्यापैकी कितीजण पोचतात हा मोठा प्रश्नच आहे. मात्र याच्या अगदी उलट, काही लोक कुणाला दाखवण्यासाठी नव्हे तर कुणालातरी जगवण्यासाठी प्रकाशझोतात न येता उभ आयुष्य वेचत असतात. या चित्रपटातील पात्र ह्या दुसर्या प्रकारात मोडतात, त्यामुळे अर्थातच त्याचं कार्य प्रकाशझोतात नसल्याने पडद्यावर पाहताना आपल्याला अनेक आश्चर्याचे धक्के बसतात  बर्याच समीक्षकांनी हा प्रवास "सिनेमा" म्हणून कसा आहे हे अभ्यासपूर्णरित्या मांडलं आहे. पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून त्याच...

कॅमेऱ्यात साठवलेला सह्याद्री

नमस्कार मंडळी,                    महाराष्ट्राला कवी लोकांनी कायमच भरपूर उपाध्या देऊन गौरवलेल आहे. महाराष्ट्राची वन्यसंपत्ती किती मोठी आहे ह्या बद्दल आपण वाचलही असेल पण ती जर बसल्याजागी पाहता आली  तर????? …मोठी पर्वणीच ठरेल ती.                     हे स्वप्न सत्यात उतरवलय  किरण घाडगे  यांनी. त्यांनी खूप मेहनतीन ही संपत्ती आपल्यासमोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. तर हि संधी दवडू नका आणि त्याचं कौतुक करायला सुद्धा विसरू नका.                   हि संपत्ती याची देही याची डोळा पाहण्यासाठी येथे click करा . मला खात्री आहे हे पाहून तुम्हाचा महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान कैक पटीन वाढेल. आनंद घ्या आणि share करून इतरांनाही तो घेण्याची संधी द्या . धन्यवाद!

मराठी प्रेमींनो : हि सुवर्णसंधी दवडू नका

Image
  नमस्कार मंडळी,                       महाकवी ग.दि.माडगूळकरांच्या गीतांचा महाखजिना आता लवकरच MP3 गाणी स्वरुपात DVD/CD वर उपलब्ध होत आहे.यात गदिमांच्या ७०० मूळ MP3 गाण्यांचा (ध्वनी स्वरुपात) समावेश आहे. DVD Version आपल्या संगणकावर तसेच DVD-MP3 सपोर्ट असलेल्या पोर्टेबल डिव्हीडी प्लेयरवर चालेल,CD Version आपल्या संगणकावर तसेच CD-MP3/DVD-MP3 सपोर्ट असलेल्या पोर्टेबल सीडी/डिव्हीडी प्लेयरवर चालेल,याशिवाय आपण ही गाणी MP3 प्लेयर असलेल्या आपल्या स्मार्ट फोन व टॅबलेटवरुन सुद्धा ऐकू शकाल. ७०० MP3 गाण्यात गदिमा साईटवर असलेल्या जवळजवळ सर्व गीतांचा समावेश आहे. ७०० MP3 गाण्यात समावेश : मराठी गाणी,चित्रपटगीते,बालगीते,भक्ति गीते,लावण्या,भावगीते,देशभक्ति प र गीते  गीतरामायण,गीतगोपाल,साई दरबार,जोगिया,चैतन्य गौरव,गंगाकाठी,गदिमांचे भाषण,गदिमांच्या आवाजात कविता एक तासाचा गदिमा लघुपट डिव्हीडी/सीडी ची डिलिव्हरी १६ ऑक्टोबर २०१४ पासून सुरु होत आहे,प्रि.ऑर्डर करणार्‍यांसाठी घटस्थापने पासून गदिमांच्या ९५व्या जयंती न...

नमस्कार

नमस्कार मंडळी,                    मला आवडलेलं, जाणवलेल आणि मी अनुभवलेलं सार काही मी इथे लिहिलं आहे. धन्यवाद! आपला नम्र,