Posts

Showing posts from October, 2014

दादा कोंडके - "एकटा जीव" पुस्तकानुभव

Image
पुस्तकाचे मुखपृष्ठ पुस्तक: "एकटा जीव"           लेखक: दादा कोंडके   शब्दांकन: अनिता पाध्ये   प्रकाशक: अनुबंध प्रकाशन   ISBN10: 8186144994 सिनेकलाकारांची दुनिया आपल्याला कायमच रंगीबेरंगी वाटत आली आहे. त्यां चा थाटमाट आणि त्यांना मिळणारा मान सन्मान पाहून आपल्याला त्यांच्या जगण्याचा हेवा वाटत नसेल तरच नवल. प्रसारमाध्यम सोडली तर त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेण्याची फारशी संधी आपल्याला मिळत नाही. प्रसारमाध्यमही त्यांना सोयीस्कर अशाच बातम्या आपल्याला पुरवत असतात त्यामुळे त्यांच्या विश्वासहर्तेवरही प्रश्नचिन्ह उभे राहते. मग पडद्यामागील गोष्टी समजून घेण्यासाठी दोनच पर्याय उपलब्ध असतात एक म्हणजे त्या कलाकाराशी केलेली प्रत्यक्ष बातचीत किंवा त्याने प्रामाणिकपणे लिहिलेलं आत्मचरित्र. पहिला पर्याय स्वीकारणं सर्वांना शक्य होतच असं नाही, पण दुसरा पर्याय हा सर्वांना स्वीकाराण्याजोगा आहे आणि ह्या दुसर्या पर्यायाचे वैशिष्ट्य म्हणजे ते लिहिणारी व्यक्ती हयात असो वा नसो आपल्याला तिच्या अनुभवाची शिदोरी मिळायला अडचण येत नाह

मला आवडलेला चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो (Dr. Prakash Baba Amte- The real Hero)

Image
चित्रपटाचे पोस्टर मराठी भाषेत सध्या अनेक दर्जेदार चित्रपट बनत आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे "डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो". सामजिक विषयावर भाष्य करणारे मराठीमध्ये आजवर अनेक चित्रपट बनले आहेत. पण हा चित्रपट  त्यापासून निश्चितच वेगळा वाटतो कारण हा एक जीवनपट आहे. विविध प्रसंगांमधून हा चित्रपट समाजसेवेसाठी आयुष्य वेचलेल्या डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे या जोडीचा खडतर प्रवास दाखवतो. "मी समाजसेवा करते/करतो" या वाक्याचा उच्चार उच्चभू मंडळी सातत्याने करताना दिसतात. खरतर गरजूंपर्यंत त्यापैकी कितीजण पोचतात हा मोठा प्रश्नच आहे. मात्र याच्या अगदी उलट, काही लोक कुणाला दाखवण्यासाठी नव्हे तर कुणालातरी जगवण्यासाठी प्रकाशझोतात न येता उभ आयुष्य वेचत असतात. या चित्रपटातील पात्र ह्या दुसर्या प्रकारात मोडतात, त्यामुळे अर्थातच त्याचं कार्य प्रकाशझोतात नसल्याने पडद्यावर पाहताना आपल्याला अनेक आश्चर्याचे धक्के बसतात  बर्याच समीक्षकांनी हा प्रवास "सिनेमा" म्हणून कसा आहे हे अभ्यासपूर्णरित्या मांडलं आहे. पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून त्याच

कॅमेऱ्यात साठवलेला सह्याद्री

नमस्कार मंडळी,                    महाराष्ट्राला कवी लोकांनी कायमच भरपूर उपाध्या देऊन गौरवलेल आहे. महाराष्ट्राची वन्यसंपत्ती किती मोठी आहे ह्या बद्दल आपण वाचलही असेल पण ती जर बसल्याजागी पाहता आली  तर????? …मोठी पर्वणीच ठरेल ती.                     हे स्वप्न सत्यात उतरवलय  किरण घाडगे  यांनी. त्यांनी खूप मेहनतीन ही संपत्ती आपल्यासमोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. तर हि संधी दवडू नका आणि त्याचं कौतुक करायला सुद्धा विसरू नका.                   हि संपत्ती याची देही याची डोळा पाहण्यासाठी येथे click करा . मला खात्री आहे हे पाहून तुम्हाचा महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान कैक पटीन वाढेल. आनंद घ्या आणि share करून इतरांनाही तो घेण्याची संधी द्या . धन्यवाद!

मराठी प्रेमींनो : हि सुवर्णसंधी दवडू नका

Image
  नमस्कार मंडळी,                       महाकवी ग.दि.माडगूळकरांच्या गीतांचा महाखजिना आता लवकरच MP3 गाणी स्वरुपात DVD/CD वर उपलब्ध होत आहे.यात गदिमांच्या ७०० मूळ MP3 गाण्यांचा (ध्वनी स्वरुपात) समावेश आहे. DVD Version आपल्या संगणकावर तसेच DVD-MP3 सपोर्ट असलेल्या पोर्टेबल डिव्हीडी प्लेयरवर चालेल,CD Version आपल्या संगणकावर तसेच CD-MP3/DVD-MP3 सपोर्ट असलेल्या पोर्टेबल सीडी/डिव्हीडी प्लेयरवर चालेल,याशिवाय आपण ही गाणी MP3 प्लेयर असलेल्या आपल्या स्मार्ट फोन व टॅबलेटवरुन सुद्धा ऐकू शकाल. ७०० MP3 गाण्यात गदिमा साईटवर असलेल्या जवळजवळ सर्व गीतांचा समावेश आहे. ७०० MP3 गाण्यात समावेश : मराठी गाणी,चित्रपटगीते,बालगीते,भक्ति गीते,लावण्या,भावगीते,देशभक्ति प र गीते  गीतरामायण,गीतगोपाल,साई दरबार,जोगिया,चैतन्य गौरव,गंगाकाठी,गदिमांचे भाषण,गदिमांच्या आवाजात कविता एक तासाचा गदिमा लघुपट डिव्हीडी/सीडी ची डिलिव्हरी १६ ऑक्टोबर २०१४ पासून सुरु होत आहे,प्रि.ऑर्डर करणार्‍यांसाठी घटस्थापने पासून गदिमांच्या ९५व्या जयंती निमित्त ही MP3 डिव्हीडी/सीडी विशेष मेगा सवलतीत (४०% पर्यंत सूट) उपलब्ध होत आहे

नमस्कार

नमस्कार मंडळी,                    मला आवडलेलं, जाणवलेल आणि मी अनुभवलेलं सार काही मी इथे लिहिलं आहे. धन्यवाद! आपला नम्र,