Posts

Showing posts from January, 2022

रात्री थंडी कोठुन येते?

Image
हे कोडं सोडवण्याआधी थोडी शास्त्रीय माहिती जाणून घेऊ. "प्लॅन्क" नावाच्या शास्त्रज्ञाने औष्णिक किरणोत्सार (Thermal Radiation) विभागात मोठं काम करून ठेवलं आहे. त्याने एखाद्या वस्तूच्या तापमानावरून ती वस्तू किती औष्णिक किरणोत्सार (जो कि इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग (electromagnetic waves) स्वरूपात असतो) करते याच सूत्र मांडलं. त्याला प्लॅन्क चा नियम असे म्हणतात. आणि सांगितलं कि प्रत्येक पदार्थ जो -२७३ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाचा आहे तो अनंत म्हणजे सर्वच तरंग लांबीचा औष्णिक किरणोत्सार अविरतपणे करतो. आणि सर्वात जास्त औष्णिक किरणोत्सार करणारी तरंगलांबी हि त्या तापमानावर अवलंबून असते जे कि "विन" या शास्त्रज्ञाने सूत्रासहित दाखवून दिलं.   आता या सर्व गोष्टींचा साधा सोपा अर्थ काय ते पाहू. १. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी आणि आपले शरीरही -२७३ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाचे असल्याने आपण कायम इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांचा औष्णिक किरणोत्सार करतो आणि ते होत असलेल्या भोवतालात वावरतो. २. ह्या किरणोत्साराने पदार्थाचे तापमान कमी कमी होत जाते, पण जर प

हवामान बदलाचे परिणाम

Image
हवामान बदल हा कोणी मानो अथवा न मानो, त्याच्या होणाऱ्या परिणामांपासून कोणीही वाचू शकत नाही हे सत्य आहे. हवामान बदलाचे मूळ कारण म्हणजे वातावरणात असणाऱ्या वायूंच्या प्रमाणात झालेला बदल. झालयं असं कि मुख्यत्वे कार्बन डायऑक्साइड वायूचं प्रमाण हे विविध कारणांनी वाढू लागलयं आणि याचा परिणाम लॉन्ग वेव्ह रेडिएशन शोषणावर होऊन पृथ्वीवरील तापमान वाढू लागलयं. आता बरेच लोक असं मानतात कि हवामान बदल वैगरे खोटे आहे, कारण त्यांच्यावर त्याचा थेट परिणाम झालेला नसतो. परंतु पृथ्वीवरील वातावरण आणि पृष्ठभाग हा प्रत्येक ठिकाणी सारखा नसल्याने हवामान बदलाचे परिणाम सर्व ठिकाणी सारखे दिसणार नाहीत. हवामान बदलाच्या परिणामाचे मोजमाप करण्यासाठी Germanwatch observatory एक Global Climate Risk Index (जागतिक हवामान धोका निर्देशांक) नावाचं परिमाण वापरते. Global Climate Risk Index हे हवामान-संबंधित नुकसानीच्या घटनां (वादळ, पूर, उष्णतेच्या लाटा इ.) च्या प्रभावामुळे तो देश किती प्रमाणात प्रभावित झाला आहे याचं विश्लेषण करते. यामध्ये मुख्यत्वेकरून जीवित आणि वित्त हानी यांचा समावेश केला जातो. या मूल्यमापनानुसार

चक्रीवादळ आणि कारणे

Image
आजकल वारंवार येणाऱ्या चक्रीवादळांमुळे किंवा त्याचे थेट परिणाम भोगल्यामुळे आपल्या मनात ते समजून घेण्याची जिज्ञासा निर्माण होणे स्वाभाविक आहे. अगदी मोजक्या शब्दांत या प्रश्नाचे सर्वांगाने उत्तर देणे तसे अवघड आहे कारण हे सांगताना बऱ्याच तांत्रिक संज्ञा समजून घ्याव्या लागतील. तरीही मी जरा सोप्या भाषेत ते देण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम आपण खालील काही बाबी समजावून घेऊ: १. हवेचा प्रवाह हा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतो. उदाहरणार्थ, हवा भरलेल्या टायरला छिद्र पडल्यास त्यातील हवा बाहेर येते कारण टायर मधल्या हवेचा दाब हा वातावरणातील हवेच्या दाबापेक्षा जास्त असतो. २. पाण्याची वाफ हि हवेपेक्षा हलकी असल्यामुळे तीचा प्रवाह कायम वर जाताना दिसतो. उदाहरणार्थ, गरम पाण्यातील वाफ कायम वर जाते. ३. गरम हवा हि थंड हवेपेक्षा हलकी असल्याने तीचा प्रवाह कायम वर जाताना दिसतो. उदाहरणार्थ, पत्र्याच्या घरात उन्हाळ्यात माळ्यावर जास्त गरम लागते. ४. पृथ्वी स्थिर नसल्याने म्हणजेच ती स्वतःभोवती फिरत असल्याने हवेचा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे होणार प्रवाह सरळ रेषेत नसून वळणदार असतो. ह्या वळणाची

घराबाहेर पडलो कि . . . .

Image
एकदा घरापासून लांब राहील कि आपल्याला घराची आठवण येतेच पण ज्यासाठी आपण बाहेर पडलो ती जबाबदारी सुद्धा मनात घर करून असते. काही दिवसांनी आपण आपल्या कामात आणि नव्या जागेत रुळू लागतो आणि आपलं एक नवीन जग तयार व्हायला सुरुवात होते. हे जग म्हणेज आपला मित्रपरिवार, शिक्षणसंस्था/नोकरीचे ठिकाण आणि आजूबाजूचा परिसर यांनी बनलेल असतं. घरापासून लांब राहिल्याने एक मोठा बदल निर्माण होतो. तो म्हणजे आपण दोन चेहरे घेऊन वावरायला लागतो. एक चेहरा आपल्या जमिनीशी नाळ सांगणारा आणि दुसरा आपल्या व्यावहारिक जीवनातला.   आपण घर सोडलं त्यावेळी आपल्या आजूबाजूच्या सर्वच लोकांची आपल्या मनात एक वेगळी छाप पडलेली असते. परंतु आपण घरी नसताना या माणसांमध्ये पण विलक्षण बदल झालेले असतात हे आपण साफ विसरून जातो आणि जुन्या संदर्भाने सर्व पाहतो. मग आपण अधून मधून घरी आलो कि लोकांबरोबर जुन्या पद्धतीने वागण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जिथं ते नातं सोडलं तिथून पुढे नेण्याचा प्रयत्न करतो पण ते सर्व आपल्यासारखे पुढे निघून गेलेले असतात हे आपण समजून घेत नाही. ह्याच कारणाने आपण पुढे गेलो असलो तरी घराकडील माणसांसाठी एक

मॉन्सून या शब्दाचे मूळ काय?

Image
मान्सून हे नाव अरबी/हिंदी भाषेतील "मौसम" म्हणजेच मराठीतील ऋतू ह्या शब्दावरून आलेले आहे. ह्या शब्दाचा वापर अरब व्यापाऱ्याकडून करण्यात आला असं मानलं जात. जुन ते सप्टेंबर या काळात अरबी समुद्रात वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशा आणि गतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतो आणि समुद्रालगत वारे नैऋत्य दिशेने वाहू लागतात आणि त्यामुळे भारतात पाऊस पडतो. हा बदल मोठा आणि दीर्घकाळ टिकणारा असल्याने व्यापाऱ्यांसाठी (जे पूर्वी मालवाहतुकीसाठी शिडाची जहाजे वापरत) महत्वाचा होता आणि त्यांच्या व्यावहारिक बोलण्यामधूनच मान्सून हा शब्द उदयास आला असे मानतात. मान्सून मध्ये वाहणाऱ्या वाऱ्याचा संपूर्ण प्रवास पाहिल्यास तो जास्तीत जास्त समुद्रावरून होत असल्याचे आपल्या लक्षात येईल. हे वारे समुद्रावरून वाहत असल्याने आपल्यासोबत लक्षणीय प्रमाणात बाष्प घेऊन येतात आणि त्यामुळे ढग बनून पाऊस पडायला मदत होते. एक महत्वपूर्ण माहिती: मानवाने जेव्हापासून पावसाची नोंद करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून मान्सून हा नियमितपणे दरवर्षी येत आहे. यामध्ये खंड पडल्याची नोंद अजूनतरी मिळालेली नाही. परंतु तो जरी नियमित होत अस