रात्री थंडी कोठुन येते?


हे कोडं सोडवण्याआधी थोडी शास्त्रीय माहिती जाणून घेऊ.

"प्लॅन्क" नावाच्या शास्त्रज्ञाने औष्णिक किरणोत्सार (Thermal Radiation) विभागात मोठं काम करून ठेवलं आहे. त्याने एखाद्या वस्तूच्या तापमानावरून ती वस्तू किती औष्णिक किरणोत्सार (जो कि इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग (electromagnetic waves) स्वरूपात असतो) करते याच सूत्र मांडलं. त्याला प्लॅन्क चा नियम असे म्हणतात. आणि सांगितलं कि प्रत्येक पदार्थ जो -२७३ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाचा आहे तो अनंत म्हणजे सर्वच तरंग लांबीचा औष्णिक किरणोत्सार अविरतपणे करतो. आणि सर्वात जास्त औष्णिक किरणोत्सार करणारी तरंगलांबी हि त्या तापमानावर अवलंबून असते जे कि "विन" या शास्त्रज्ञाने सूत्रासहित दाखवून दिलं.


 

आता या सर्व गोष्टींचा साधा सोपा अर्थ काय ते पाहू.

१. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी आणि आपले शरीरही -२७३ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाचे असल्याने आपण कायम इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांचा औष्णिक किरणोत्सार करतो आणि ते होत असलेल्या भोवतालात वावरतो.

२. ह्या किरणोत्साराने पदार्थाचे तापमान कमी कमी होत जाते, पण जर पदार्थातून होणारा औष्णिक किरणोत्सार आणि पदार्थाने शोषलेला औष्णिक किरणोत्सार जर समान असतील तर त्याच्या तापमानात काहीच बदल होत नाही.

३. त्याचप्रमाणे जर पदार्थातून होणारा औष्णिक किरणोत्सार हा पदार्थाने शोषलेल्या औष्णिक किरणोत्सारापेक्षा कमी असेल तर त्याच्या तापमानात वाढ होत राहते.

४. याचा अर्थ -२७३ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाच्या पदार्थातून होणारा औष्णिक किरणोत्सार हा कायम त्या पदार्थाला थंड करत असतो.

आता विचारलेल्या मूळ प्रश्नाचे उत्तर देणं अगदी सोपं झालं. दिवसा सूर्याकडून होणारा औष्णिक किरणोत्सार हा पृथ्वी करत असलेल्या औष्णिक किरणोत्सारापेक्षा जास्त असल्याने तापमान वाढते आणि रात्री सूर्य नसल्याने पृथ्वीकडून होणारा औष्णिक किरणोत्सार पृथ्वीचे तापमान कमी करतो आणि थंडी वाढते.

धन्यवाद!

---- डॉ. शैनाथ कळमकर

(All Copyrights with The writer. Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof. Not to be shared in quotes, or paragraphs. If shared online, must be shared in totality.)

 

Comments

Popular posts from this blog

मला आवडलेला चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो (Dr. Prakash Baba Amte- The real Hero)

दादा कोंडके - "एकटा जीव" पुस्तकानुभव

"कट्यार काळजात घुसली" च्या निमीत्ताने