चक्रीवादळ आणि कारणे

आजकल वारंवार येणाऱ्या चक्रीवादळांमुळे किंवा त्याचे थेट परिणाम भोगल्यामुळे आपल्या मनात ते समजून घेण्याची जिज्ञासा निर्माण होणे स्वाभाविक आहे. अगदी मोजक्या शब्दांत या प्रश्नाचे सर्वांगाने उत्तर देणे तसे अवघड आहे कारण हे सांगताना बऱ्याच तांत्रिक संज्ञा समजून घ्याव्या लागतील. तरीही मी जरा सोप्या भाषेत ते देण्याचा प्रयत्न करतो.

IMD issues yellow alert for cyclone in north Andhra Pradesh, south Odisha |  depression over Bay of Bengal| IMD| yellow alert of cyclone| India latest  news| breaking news

सर्वप्रथम आपण खालील काही बाबी समजावून घेऊ:

१. हवेचा प्रवाह हा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतो. उदाहरणार्थ, हवा भरलेल्या टायरला छिद्र पडल्यास त्यातील हवा बाहेर येते कारण टायर मधल्या हवेचा दाब हा वातावरणातील हवेच्या दाबापेक्षा जास्त असतो.

२. पाण्याची वाफ हि हवेपेक्षा हलकी असल्यामुळे तीचा प्रवाह कायम वर जाताना दिसतो. उदाहरणार्थ, गरम पाण्यातील वाफ कायम वर जाते.

३. गरम हवा हि थंड हवेपेक्षा हलकी असल्याने तीचा प्रवाह कायम वर जाताना दिसतो. उदाहरणार्थ, पत्र्याच्या घरात उन्हाळ्यात माळ्यावर जास्त गरम लागते.

४. पृथ्वी स्थिर नसल्याने म्हणजेच ती स्वतःभोवती फिरत असल्याने हवेचा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे होणार प्रवाह सरळ रेषेत नसून वळणदार असतो. ह्या वळणाची दिशा हि तुम्ही उत्तर गोलार्धात आहेत कि दक्षिण गोलार्धात आहात यावर ठरते. यालाच "coriolis effect" असे म्हणतात.

५. पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष हा सूर्याच्या अक्षाला समांतर नसल्याने आणि पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कशा सममितीय नसल्याने १२ महिने पृथ्वीवर सारखा सूर्यप्रकाश पडत नाही परिणामी आपण ऋतुचक्र अनुभवतो.

६. उष्णकटिबंधीय क्षेत्र म्हणजे पृथ्वीवरील असा भूभाग जिथे सूर्याची किरणे वर्षातून दोनदा ९० अंशात पडतात. मकरवृत्त आणि कर्कवृत्त हे या क्षेत्राची सीमा ठरवतात.

७. ज्या भागात सूर्याची किरणे तिरपी पडतात ते प्रदेश उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या जवळील प्रदेश आहेत आणि तिथे हवामान कायम थंड असते.

चक्रीवादळाची निर्मिती:

चक्रीवादळ तापलेल्या समुद्राच्या पृष्ठभागामुळे तयार होतात. याचाच अर्थ उष्णकटिबंधीय भागात चक्रीवादळे जास्त येतात असतात. तापलेल्या सुमद्रावरील दमट आणि गरम झालेली हवा वरच्या दिशेला वाहू लागते. ह्या वर गेलेल्या हवेमुळे समुद्राच्या पृष्ठभागाजवळ कमी दाब निर्माण होतो आणि तो आजूबाजूच्या त्याहून अधिक दाब असलेल्या हवेला आपल्याकडे खेचतो. मग हि नवी आलेली हवा हि समुद्राच्या तापलेल्या पृष्ठभागामुळे गरम होऊन वर जाते. आणि मग हे चक्र चालू होत.

जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जाणारी हवा वर क्रमांक ४ मध्ये सांगितल्याप्रमाणे "coriolis effect" मुळे सरळ न जात वळण घेऊन जाते आणि चक्राकार हवेचा प्रवाह निर्माण होतो. उत्तर आणि दक्षिण गोलार्धात ह्या चक्राची दिशा परस्पर विरोधी असते. उत्तर गोलार्धातील चक्रीवादळे हि घड्याळातील काट्यांच्या विरुद्ध डिरेषेने तर दक्षिण गोलार्धातील चक्रीवादळे घड्याळातील काट्यांच्या दिशेने फिरतात.

जस जशी वर जाणारी दमट हवा थंड होते, तसे ढग तयार होतात. तापलेला समुद्र आणि दमट हवा ह्यांच्या एकत्रित परिणामामुळे सतत वर जाणाऱ्या हवेचे ढग बनण्याची प्रक्रिया जोमाने सुरु होते. चालू झालेल्या या प्रक्रियेची तीव्रता हि कालांतराने वाढत जाते आणि वादळ जमिनीला धडकत नाही तोपर्यंत चालू राहते. चक्रीवादळाचे वर्गीकरण हे त्यामुळे निर्माण झालेल्या हवेच्या प्रवाहाच्या गतीच्या आधारावर केले जाते.

चक्रीवादळाची कारणे:

वर सांगितल्याप्रमाणे चक्रीवादळाचा थेट संबंध हा समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाशी आहे. सतत येणारी चक्रीवादळे हेच दर्शवतात कि समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान हे वाढलेलं आहे. हे तापमान अवास्तव पद्धतीने वाढण्यामागे "green house effect" चा थेट संबंध आहे असं बहुतांश शास्त्रज्ञ मानतात.

धन्यवाद.

---- डॉ. शैनाथ कळमकर

(All Copyrights with The writer. Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof. Not to be shared in quotes, or paragraphs. If shared online, must be shared in totality.)

 

Comments

Popular posts from this blog

मला आवडलेला चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो (Dr. Prakash Baba Amte- The real Hero)

दादा कोंडके - "एकटा जीव" पुस्तकानुभव

"कट्यार काळजात घुसली" च्या निमीत्ताने