रात्री थंडी कोठुन येते?
हे कोडं सोडवण्याआधी थोडी शास्त्रीय माहिती जाणून घेऊ. "प्लॅन्क" नावाच्या शास्त्रज्ञाने औष्णिक किरणोत्सार (Thermal Radiation) विभागात मोठं काम करून ठेवलं आहे. त्याने एखाद्या वस्तूच्या तापमानावरून ती वस्तू किती औष्णिक किरणोत्सार (जो कि इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग (electromagnetic waves) स्वरूपात असतो) करते याच सूत्र मांडलं. त्याला प्लॅन्क चा नियम असे म्हणतात. आणि सांगितलं कि प्रत्येक पदार्थ जो -२७३ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाचा आहे तो अनंत म्हणजे सर्वच तरंग लांबीचा औष्णिक किरणोत्सार अविरतपणे करतो. आणि सर्वात जास्त औष्णिक किरणोत्सार करणारी तरंगलांबी हि त्या तापमानावर अवलंबून असते जे कि "विन" या शास्त्रज्ञाने सूत्रासहित दाखवून दिलं. आता या सर्व गोष्टींचा साधा सोपा अर्थ काय ते पाहू. १. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी आणि आपले शरीरही -२७३ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाचे असल्याने आपण कायम इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांचा औष्णिक किरणोत्सार करतो आणि ते होत असलेल्या भोवतालात वावरतो. २. ह्या किरणोत्साराने पदार्थाचे तापमान कमी कमी होत जाते, पण जर प