Posts

"घेई छंद" पुस्तकानुभव

Image
लेखक: सुबोध भावे
प्रकाशक: रसिक आन्तरभारती

अगदी लहानपणापासून चित्रपट हे मनोरंजनच माध्यम म्हणून समोर असल्याने अर्थातच जवळजवळ सर्वांनाच चित्रपट क्षेत्र आणि त्याची निर्मिती ह्याबद्दल जाणून घ्यायची खूप उत्सुकता असते. बऱ्याच वेळा याच उत्सुकतेपोटी आपण एखादं चित्रपट विषयक मासिक किंवा लेख किंवा मुलाखती वाचत किंवा ऐकत असतो. पण ह्या गोष्टी सांगताना खूपदा वास्तव बाजूला सारून ती माहिती खपवण्यासाठी मसालेदार पद्धतीने मांडली जाते आणि मग सत्य हरवून बसत. हे टाळण्यासाठी एकतर चित्रपट सृष्टीतील एखाद्या व्यक्तीचं आत्मचरित्र किंवा चरित्रवर्णन वाचणं हा सोपा मार्ग आहे. हे लक्षात घेऊन मी मागे "एकटा जीव" हे पुस्तक वाचलं आणि मला ते आवडलही. परंतु एखाद्या मराठी चित्रपटाची निर्मिती किंवा त्याची जन्मकथा सांगणार पुस्तक मात्र मला सापडलं नव्हतं. असंच एकदा ट्विटरवर सुबोध भावेचं एक ट्विट दिसलं आणि मी अधीर झालो. त्याने त्यात त्याच्या पहिल्या वाहिल्या पुस्तकाबद्दल सांगितलं होत आणि ते पुस्तक त्याच्या १ नाटक आणि ३ चित्रपटांच्या निर्मितिप्रवासाबद्दल होत. मी लागलीच फोन करून एक प्रत बुक केली. 
अर्थातच त्याने ह्या पुस्तक…

"कट्यार काळजात घुसली" च्या निमीत्ताने

Image
सामान्य रसिक आणि शास्त्रीय संगीताचा रसिक यांमध्ये नाही म्हंटलतरी एक प्रकारची जातीयता समाजात पाहायला मिळते. शास्त्रीय संगीत ऐकणारे म्हणजे खूप बुद्धिवान, दर्दी रसिक आणि सधन अशा विशेषणाने संबोधले जातात. परंतु पुलंनी सांगितल्याप्रमाणे काही लोक अशा शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात चक्क झोपदेखील काढतात आणि अगदी अशाच प्रकारचा अनुभव अच्युत गोडबोले यांनीही त्यांच्या "नादवेध" या पुस्तकात नमूद केला आहे. याचाच अर्थ असे काही लोक संगीताचा आस्वाद घ्यायला नव्हे तर वर नमूद केलेली विशेषणे आपल्यासमोर लागावी म्हणून अशा कार्यक्रमाला हजेरी लावत असतात.
माझ्यामते तर शास्त्रीय संगीताचा आनंद घेण्यासाठी त्याचे बारकावे, राग किंवा त्याचा इतिहास माहित असण्याची अजिबात गरज नसते. जे मनाला भिडेल ते संगीत आपल होऊन जात असत आणि मग त्याचा राग वैगेरे या गोष्टी गौण असतात. पंडित भीमसेन जोशींच "तीर्थ विठ्ठल" हे गाण कुणाला आवडत नाही? नुकतच माझ्या वाचनात आल कि या गाण्याला विविध रागांचा साज चढवण्यात आलाय. पण या गोष्टी माहित नसतानाही लोकांना ते आवडलं त्याच एक कारण म्हणजे अनमोल अस हे गाणं रसिकांना …

थियटरमधील थरार! (सत्यघटना)

मला मराठी फिल्म्स थियटर मध्ये जाऊन पाहण्याची सवय आहे, सर्वच नाही पण निवडक सिनेमे मी हमखास पाहतो. असो. या सवयीप्रमाणे मी १४ ऑगस्टला कांजुरमार्गच्या हुमा थियटर मध्ये मित्रासोबत त्याच दिवशी प्रदर्शित झालेला "डबल सीट" सिनेमा पाहायला गेलो होतो. आणि थियटर हाउसफुल होत. सरकारी नियमाप्रमाणे सिनेमा सुरु होण्याआधी राष्ट्रगीत लागत. थियटर नुसार वेगवेगळ्या थीमची राष्ट्रगीत सादर केली जातात. ह्यावेळी राष्ट्रगीताची थीम होती "सामान्य भारतीयाला समर्पित राष्ट्रगान". खूपच सुंदर सादरीकरण असल्याकारणान सार थियटर मंत्रमुग्ध होऊन शांतपणे उभे राहून पाहत होत. राष्ट्रगीत संपल आणि जोरात एक आवाज एकू आला. तो सवयीप्रमाणे "भारतमाता कि जय!" वैगेरे नव्हता. तो होता "कोण आहे तो पुढे बसलेला?? तो अपंग आहे का?? उठवा त्याला." तावतावने एक मध्यम वयाची स्त्री ओरडत होती. तिचा ह्या विचारण्याने आम्हा सर्वांच लक्ष त्याच्याकडे गेल, तो मुलगा पायावर पाय टाकून निवांत मोबाईल मधले फोटो पाहत बसला होता. त्याला त्या बोलण्याच सोयरसुतक नव्हतं. त्या स्त्रीच्या ओरडण्याने बर्याच लोकांच्या कं…

दादा कोंडके - "एकटा जीव" पुस्तकानुभव

Image
पुस्तक: "एकटा जीव"
लेखक: दादा कोंडके
शब्दांकन: अनिता पाध्ये
प्रकाशक: अनुबंध प्रकाशन
ISBN10: 8186144994
सिनेकलाकारांची दुनिया आपल्याला कायमच रंगीबेरंगी वाटत आली आहे. त्यांचा थाटमाट आणि त्यांना मिळणारा मान सन्मान पाहून आपल्याला त्यांच्या जगण्याचा हेवा वाटत नसेल तरच नवल. प्रसारमाध्यम सोडली तर त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेण्याची फारशी संधी आपल्याला मिळत नाही. प्रसारमाध्यमही त्यांना सोयीस्कर अशाच बातम्या आपल्याला पुरवत असतात त्यामुळे त्यांच्या विश्वासहर्तेवरही प्रश्नचिन्ह उभे राहते. मग पडद्यामागील गोष्टी समजून घेण्यासाठी दोनच पर्याय उपलब्ध असतात एक म्हणजे त्या कलाकाराशी केलेली प्रत्यक्ष बातचीत किंवा त्याने प्रामाणिकपणे लिहिलेलं आत्मचरित्र. पहिला पर्याय स्वीकारणं सर्वांना शक्य होतच असं नाही, पण दुसरा पर्याय हा सर्वांना स्वीकाराण्याजोगा आहे आणि ह्या दुसर्या पर्यायाचे वैशिष्ट्य म्हणजे ते लिहिणारी व्यक्ती हयात असो वा नसो आपल्याला तिच्या अनुभवाची शिदोरी मिळायला अडचण येत नाही. बर्याचदा आत्मचारीत्र हि दबावाखाली लिहिली जातात म्हणजे…

मला आवडलेला चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो (Dr. Prakash Baba Amte- The real Hero)

Image
मराठी भाषेत सध्या अनेक दर्जेदार चित्रपट बनत आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे "डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो". सामजिक विषयावर भाष्य करणारे मराठीमध्ये आजवर अनेक चित्रपट बनले आहेत. पण हा चित्रपट  त्यापासून निश्चितच वेगळा वाटतो कारण हा एक जीवनपट आहे. विविध प्रसंगांमधून हा चित्रपट समाजसेवेसाठी आयुष्य वेचलेल्या डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे या जोडीचा खडतर प्रवास दाखवतो. "मी समाजसेवा करते/करतो" या वाक्याचा उच्चार उच्चभू मंडळी सातत्याने करताना दिसतात. खरतर गरजूंपर्यंत त्यापैकी कितीजण पोचतात हा मोठा प्रश्नच आहे. मात्र याच्या अगदी उलट, काही लोक कुणाला दाखवण्यासाठी नव्हे तर कुणालातरी जगवण्यासाठी प्रकाशझोतात न येता उभ आयुष्य वेचत असतात. या चित्रपटातील पात्र ह्या दुसर्या प्रकारात मोडतात, त्यामुळे अर्थातच त्याचं कार्य प्रकाशझोतात नसल्याने पडद्यावर पाहताना आपल्याला अनेक आश्चर्याचे धक्के बसतात 
बर्याच समीक्षकांनी हा प्रवास "सिनेमा" म्हणून कसा आहे हे अभ्यासपूर्णरित्या मांडलं आहे. पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून त्याचं समीक्षण माझ्या अनुभवला …

कॅमेऱ्यात साठवलेला सह्याद्री

नमस्कार मंडळी,
                   महाराष्ट्राला कवी लोकांनी कायमच भरपूर उपाध्या देऊन गौरवलेल आहे. महाराष्ट्राची वन्यसंपत्ती किती मोठी आहे ह्या बद्दल आपण वाचलही असेल पण ती जर बसल्याजागी पाहता आली  तर????? …मोठी पर्वणीच ठरेल ती.                     हे स्वप्न सत्यात उतरवलय किरण घाडगे यांनी. त्यांनी खूप मेहनतीन ही संपत्ती आपल्यासमोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. तर हि संधी दवडू नका आणि त्याचं कौतुक करायला सुद्धा विसरू नका.
                  हि संपत्ती याची देही याची डोळा पाहण्यासाठी येथे click करा. मला खात्री आहे हे पाहून तुम्हाचा महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान कैक पटीन वाढेल. आनंद घ्या आणि share करून इतरांनाही तो घेण्याची संधी द्या . धन्यवाद!