हवामान बदलाचे परिणाम

हवामान बदल हा कोणी मानो अथवा न मानो, त्याच्या होणाऱ्या परिणामांपासून कोणीही वाचू शकत नाही हे सत्य आहे. हवामान बदलाचे मूळ कारण म्हणजे वातावरणात असणाऱ्या वायूंच्या प्रमाणात झालेला बदल. झालयं असं कि मुख्यत्वे कार्बन डायऑक्साइड वायूचं प्रमाण हे विविध कारणांनी वाढू लागलयं आणि याचा परिणाम लॉन्ग वेव्ह रेडिएशन शोषणावर होऊन पृथ्वीवरील तापमान वाढू लागलयं. आता बरेच लोक असं मानतात कि हवामान बदल वैगरे खोटे आहे, कारण त्यांच्यावर त्याचा थेट परिणाम झालेला नसतो. परंतु पृथ्वीवरील वातावरण आणि पृष्ठभाग हा प्रत्येक ठिकाणी सारखा नसल्याने हवामान बदलाचे परिणाम सर्व ठिकाणी सारखे दिसणार नाहीत.

हवामान बदलाच्या परिणामाचे मोजमाप करण्यासाठी Germanwatch observatory एक Global Climate Risk Index (जागतिक हवामान धोका निर्देशांक) नावाचं परिमाण वापरते. Global Climate Risk Index हे हवामान-संबंधित नुकसानीच्या घटनां (वादळ, पूर, उष्णतेच्या लाटा इ.) च्या प्रभावामुळे तो देश किती प्रमाणात प्रभावित झाला आहे याचं विश्लेषण करते. यामध्ये मुख्यत्वेकरून जीवित आणि वित्त हानी यांचा समावेश केला जातो.

या मूल्यमापनानुसार २०१९ मध्ये आफ्रिका खंडातील मोझाम्बिके आणि झिम्बाम्ब्वे त्याचप्रमाणे कॅरेबियन बेटांमधील बहामास हे देश हवामान बदलांमुळे सर्वात जास्त प्रभावित झाले. तर २००० ते २०१९ या कालखंडाचा विचार केल्यास प्वेर्टो रिको, म्यानमार आणि हैती हे देश प्रभावित होण्यामध्ये सर्वोच्च क्रमांकावर आहेत.

या बद्दलची माहिती खाली दिलेल्या तक्ते आणि नकाशांवरून अधिक स्पष्ट होईल.

आता Global Climate Risk Index पाहताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या त्या पुढीलप्रमाणे:

१. हा निर्देशांक मुख्यत्वे करून वादळ, पूर, उष्णतेच्या लाटा इत्यादि घटनांच्या प्रभावाचं मूल्यमापन करतो आणि यात समुद्राची वाढणारी पातळी, ध्रुवीय बर्फाचं वितळणं, समुद्राच्या पृष्ठभागाची तापमानवाढ आणि वाढते आम्लीकरण यांचा समावेश होत नाही.

२. हा निर्देशांक भूतकाळातील घटनांवरून आला असल्याने भविष्यकाळात हे असंच घडेल असं सांगता येत नाही.

३. हा निर्देशांक आपल्याला प्रभावित क्षेत्र आणि पराभवाची तीव्रता याचा अंदाज करण्यास मदत करते जेणेकरून तो प्रदेश त्यासाठी तयारीत राहील.

४. हा निर्देशांक १८० देशांतून मिळालेल्या माहितीवर आधारित असल्याने त्याची अचूकता माहिती देणाऱ्या संस्थेवर अवलंबून आहे. काही छोटी बेटे आणि देश पूर्ण माहितीही देऊ शकलेले नाहीत.

वरील विश्लेषणावरून आपल्याला लक्षात आले असेल कि हवामान बदलांमुळे कोणत्या देशाला जास्त धोका संभवतो. अधिक माहिती हवी असल्यास दिलेल्या संदर्भाचा अभ्यास करावा.

धन्यवाद.

संदर्भ: https://germanwatch.org/en/19777

 

---- डॉ. शैनाथ कळमकर

(All Copyrights with The writer. Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof. Not to be shared in quotes, or paragraphs. If shared online, must be shared in totality.)

 

Comments

Popular posts from this blog

मला आवडलेला चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो (Dr. Prakash Baba Amte- The real Hero)

दादा कोंडके - "एकटा जीव" पुस्तकानुभव

"कट्यार काळजात घुसली" च्या निमीत्ताने