"कट्यार काळजात घुसली" च्या निमीत्ताने

सामान्य रसिक आणि शास्त्रीय संगीताचा रसिक यांमध्ये नाही म्हंटलतरी एक प्रकारची जातीयता समाजात पाहायला मिळते. शास्त्रीय संगीत ऐकणारे म्हणजे खूप बुद्धिवान, दर्दी रसिक आणि सधन अशा विशेषणाने संबोधले जातात. परंतु पुलंनी सांगितल्याप्रमाणे काही लोक अशा शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात चक्क झोपदेखील काढतात आणि अगदी अशाच प्रकारचा अनुभव अच्युत गोडबोले यांनीही त्यांच्या "नादवेध" या पुस्तकात नमूद केला आहे. याचाच अर्थ असे काही लोक संगीताचा आस्वाद घ्यायला नव्हे तर वर नमूद केलेली विशेषणे आपल्यासमोर लागावी म्हणून अशा कार्यक्रमाला हजेरी लावत असतात.
माझ्यामते तर शास्त्रीय संगीताचा आनंद घेण्यासाठी त्याचे बारकावे, राग किंवा त्याचा इतिहास माहित असण्याची अजिबात गरज नसते. जे मनाला भिडेल ते संगीत आपल होऊन जात असत आणि मग त्याचा राग वैगेरे या गोष्टी गौण असतात. पंडित भीमसेन जोशींच "तीर्थ विठ्ठल" हे गाण कुणाला आवडत नाही? नुकतच माझ्या वाचनात आल कि या गाण्याला विविध रागांचा साज चढवण्यात आलाय. पण या गोष्टी माहित नसतानाही लोकांना ते आवडलं त्याच एक कारण म्हणजे अनमोल अस हे गाणं रसिकांना सहज उपलब्ध झाल. खुपदा शास्त्रीय संगीत हे सामान्य रसिकांपर्यंत पोचतच नाही. सामान्य रसिकाला फक्त उडत्या चालीचीच गाणी आवडतात असा काहीसा गैरसमज शास्त्रीय संगीत चित्रपटात न येण्यास कारणीभूत आहे. सामान्य रसिकांना गृहीत धरल्यानेच ते शास्त्रीय संगीतापासून दूर राहिलेत आणि सरतेशेवटी ते एका विशिष्ट वर्गापुरत मर्यादित राहत गेल.
              आता मात्र निराश होण्याच काहीच कारण नाही, कारण मराठी चित्रपट सृष्टीच्या नव्या पिढीने हा पायंडा मोडीत काढायचं ठरवलेलं दिसतंय. "बालगंधर्व" आणि "कट्यार काळजात घुसली" या सिनेमांच्या माध्यमातून ते शास्त्रीय संगीत सामान्य रसिकांपर्यंत पोचवु लागले आहेत आणि रसिकानी नुसत एकलं नाही तर डोक्यावर घेतलंय. रवी जाधव दिग्दर्शित बालगंधर्व या सिनेमाच्या निमित्ताने कौशल इनामदार यांनी नाट्यसंगीताला नवसंजीवनी दिली. आनंद भाटे नामक हिर्याची चमक यामुळे प्रेक्षकांना कळाली आणि यातील त्यांच्या "चिन्मय सकल हृदया" गाण्याने राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली. आज आनंद भाटेंच्या कार्यक्रमाला होणार्या रसिकांच्या आणि विशेषतः तरुणांच्या गर्दीचे श्रेय अंशतः का असेना पण बालगंधर्व सिनेमाला जात. या चित्रपटामुळे शास्त्रीय संगीताची जादू सामान्य रसिकांपर्यंत पोचली आणि नाट्यसंगीताला ipod मध्ये जागा मिळाली. या सिनेमानंतर मात्र शास्त्रीय संगीत फारस सिनेमात एकू आल नव्हत.  
              नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "कट्यार काळजात घुसली" या सिनेमाने पुन्हा तो प्रयत्न केला आणि प्रेक्षकांच्या भरघोस प्रदिसादाने तो यशस्वी होताना दिसतो आहे. या सिनेमाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात सचिन पिळगावकर यांनी सांगितल कि पं. वसंतराव देशपांडे त्यांना म्हणाले होते कि "कट्यार काळजात घुसली हे माझ्या आयुष्याला कलाटणी देणार नाटक ठरलं". या नाटकामुळेच रसिकांना पं. वसंतराव देशपांडें सारख्या महान गायकाची रसिकांना नवी ओळख झाली. त्याकाळी पंडित जितेंद्र अभिषेकींच्या संगीताने रसिकांवर मोहिनी टाकली आणि नाटक खूप गाजल. याच नाटकावर बेतलेला सिनेमा म्हणजेच "कट्यार काळजात घुसली".
सुबोध भावे यांनी हा चित्रपट बनवायचं शिवधनुष्य उचललं आणि ते त्यात कितपत यशस्वी झाले हे चित्रपटाच्या कमाई वरून स्पष्ट झालेलच आहे. योगायोग म्हणजे "बालगंधर्व" सिनेमातही सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका होती. "शंकर एहसान लॉय" या त्रिकुटाने या चित्रपटाला संगीताचा उत्तम साज चढवला आहे आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीत हा सिनेमा त्यांची ओळख बनणार हे मात्र नक्की. तब्बल १७ गाणी असलेला हा सिनेमा आहे आणि केवळ शास्त्रीय संगीताच्या मैफिली ऐकणारे नव्हे तर सामान्य रसिकही या चित्रपटाच्या संगीताला भरघोस प्रतिसाद देत आहेत. "कट्यार काळजात घुसली" नाटकाने जशी "पं. वसंतराव देशपांडे" यांची ओळख सामान्य रसिकांना झाली, त्याचप्रमाणे या सिनेमामुळे "राहुल देशपांडे" आणि "महेश काळे" यांची ओळख सामान्य रसिकांना होत आहे. यापुढे दोघांच्याही मैफलींना रसिकांची गर्दी होणार नसेल तरच नवल. महेश काळेंच्या "अरुणी किरणी", राहुल देशापांडेंच्या "घेई छंद" आणि शंकर महादेवन यांच्या "मन मंदिरा" या गाण्यांने रसिकांना अक्षरशः वेड लावले आहे. एका विशिष्ट चौकटीत न अडकता असा स्वर नजराणा रसिकांसमोर आणणं हे सोप काम नाही. येथे निर्मात्यांच्या धाडसालाही सलाम नक्कीच करावासा वाटतो. अर्थातच नाटक ज्यांनी निर्माण केल आणि त्याला संगीत दिल त्यांनाही याच श्रेय द्यावच लागेल. या चित्रपटासाठी काही गाणी नव्याने लिहिली गेली कौतुकाची बाबा म्हणजे ती इतकी उत्तम लिहिली व गायली गेली आहेत कि जुन्या गाण्यांच्या संचात अगदी सहज मिसळून जातात.
शेवटी काय…. सामान्य रसिकांना गृहीत न धरता अपार कष्ट घेऊन रसिकांना काहीतरी उत्तम देण्याचा प्रयत्न केला तर रसिक तो कधीही वाया जावू देत नाही. "कट्यार काळजात घुसली" हा सिनेमा हे त्याचं ताजं उदाहरण.
                                                           ---- शैनाथ कळमकर
(All Copyrights with The writer. Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof. Not to be shared in quotes, or paragraphs. If shared online, must be shared in totality.)

Comments

Vikram Choudari said…
Well said.. Most of the youth is unaware of what magical feel can classical music bring to their ears. Three cheera for Subodh bhave, Rahul Deshpande, Mahesh Kale, Shankr E. Loy for vringing this play to life.. And thanks to Shainath for writing such a nice review..
Vikram Choudari said…
Well said.. Most of the youth is unaware of what magical feel can classical music bring to their ears. Three cheera for Subodh bhave, Rahul Deshpande, Mahesh Kale, Shankr E. Loy for vringing this play to life.. And thanks to Shainath for writing such a nice review..
True! They all are just amazing. Thank you for the kind words. Best wishes!
Unknown said…
खूप छान..
खूप खूप धन्यवाद मित्रा! :)
Bhupendra Jain said…
एक नंबर रे... उत्तम लेख लिहिलाय
Unknown said…
प्रथम धन्यवाद,
छान,अगदी मनात (माझ्याही)असणारे विचार शब्दरुपाने सर्वासमोर उलगडलेस.बरे वाटले
खूप खूप धन्यवाद! :)
मस्त विश्लेषण...अगदि नेमक्या शब्दात भावना प्रकट केल्या आहेस.

Popular posts from this blog

मला आवडलेला चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो (Dr. Prakash Baba Amte- The real Hero)

दादा कोंडके - "एकटा जीव" पुस्तकानुभव