Posts

Showing posts from 2021

असा चित्रपट जो मला आवडत नाही पण जवळजवळ प्रत्येकाला आवडतो

Image
 3 idiots हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय असल्याने थोडं आश्चर्य वाटू शकत. मला हा चित्रपट आवडत नसला तरी तो अतिशय टुकार आणि टाकाऊ आहे असेही वाटत नाही. काही स्पष्टीकरण देण्याआधी मी अनुभवलेला एक प्रसंग इथे सांगावासा वाटतो.   मी NITK मध्ये M. Tech करत असताना दुसऱ्या वर्षाला एका नावाजलेल्या प्राध्यापकांबरोबर प्रोजेक्टच काम करत होतो. ते प्राध्यापक कडक शिस्तीचे पण शांत आणि मृदू स्वभावाचे होते. दुसऱ्या वर्षी केवळ प्रोजेक्ट आणि प्रबंध यांचं काम असल्यामुळे आम्ही पूर्णवेळ लॅब मध्ये काम करत असू. हेच प्राध्यापक बॅचलर्सच्या मुलांनाही शिकवत असत आणि विशेष म्हणजे त्यावर्षी एका संपूर्ण बॅचचे पालकत्व त्यांना दिल गेलं होत. पालकत्व म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एका प्राध्यापकाची नेमणूक दरवर्षी होत असते आणि संस्थाही त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांशी संपर्क साधत असते. एकेदिवशी लॅबमध्ये काम करत असताना एक पालक आमच्याकडे प्राध्यापकांविषयी चौकशी करू लागले. ते हिंदीत बोलत असल्याने बाकीच्यांनी मला पुढं केलं कारण त्यांना एकतर त्यांची मातृभाषा किंवा इंग्रजी कळायचं. मग मी त्यांना एका खोलीपर्यंत घेऊन गेलो जिथे