मॉन्सून या शब्दाचे मूळ काय?

मान्सून हे नाव अरबी/हिंदी भाषेतील "मौसम" म्हणजेच मराठीतील ऋतू ह्या शब्दावरून आलेले आहे. ह्या शब्दाचा वापर अरब व्यापाऱ्याकडून करण्यात आला असं मानलं जात. जुन ते सप्टेंबर या काळात अरबी समुद्रात वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशा आणि गतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतो आणि समुद्रालगत वारे नैऋत्य दिशेने वाहू लागतात आणि त्यामुळे भारतात पाऊस पडतो. हा बदल मोठा आणि दीर्घकाळ टिकणारा असल्याने व्यापाऱ्यांसाठी (जे पूर्वी मालवाहतुकीसाठी शिडाची जहाजे वापरत) महत्वाचा होता आणि त्यांच्या व्यावहारिक बोलण्यामधूनच मान्सून हा शब्द उदयास आला असे मानतात.

मान्सून मध्ये वाहणाऱ्या वाऱ्याचा संपूर्ण प्रवास पाहिल्यास तो जास्तीत जास्त समुद्रावरून होत असल्याचे आपल्या लक्षात येईल. हे वारे समुद्रावरून वाहत असल्याने आपल्यासोबत लक्षणीय प्रमाणात बाष्प घेऊन येतात आणि त्यामुळे ढग बनून पाऊस पडायला मदत होते.

एक महत्वपूर्ण माहिती: मानवाने जेव्हापासून पावसाची नोंद करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून मान्सून हा नियमितपणे दरवर्षी येत आहे. यामध्ये खंड पडल्याची नोंद अजूनतरी मिळालेली नाही. परंतु तो जरी नियमित होत असला तरी त्याच्या प्रमाणामध्ये कायमच कमीजास्तपणा येत आला आहे. त्यामुळे मान्सूनचे प्रमाण कमीजास्त जरी असले तरी तो नियमित आहे असं आपण मानतो.

धन्यवाद!

संदर्भ: डॉ. सुलोचना गाडगीळ यांची मान्सून या विषयावरील व्याख्याने.

---- डॉ. शैनाथ कळमकर

(All Copyrights with The writer. Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof. Not to be shared in quotes, or paragraphs. If shared online, must be shared in totality.)

 

Comments

Popular posts from this blog

मला आवडलेला चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो (Dr. Prakash Baba Amte- The real Hero)

दादा कोंडके - "एकटा जीव" पुस्तकानुभव

"कट्यार काळजात घुसली" च्या निमीत्ताने