थियटरमधील थरार! (सत्यघटना)

मला मराठी फिल्म्स थियटर मध्ये जाऊन पाहण्याची सवय आहे, सर्वच नाही पण निवडक सिनेमे मी हमखास पाहतो. असो. या सवयीप्रमाणे मी १४ ऑगस्टला कांजुरमार्गच्या हुमा थियटर मध्ये मित्रासोबत त्याच दिवशी प्रदर्शित झालेला "डबल सीट" सिनेमा पाहायला गेलो होतो. आणि थियटर हाउसफुल होत. सरकारी नियमाप्रमाणे सिनेमा सुरु होण्याआधी राष्ट्रगीत लागत. थियटर नुसार वेगवेगळ्या थीमची राष्ट्रगीत सादर केली जातात. ह्यावेळी राष्ट्रगीताची थीम होती "सामान्य भारतीयाला समर्पित राष्ट्रगान". खूपच सुंदर सादरीकरण असल्याकारणान सार थियटर मंत्रमुग्ध होऊन शांतपणे उभे राहून पाहत होत. राष्ट्रगीत संपल आणि जोरात एक आवाज एकू आला. तो सवयीप्रमाणे "भारतमाता कि जय!" वैगेरे नव्हता. तो होता "कोण आहे तो पुढे बसलेला?? तो अपंग आहे का?? उठवा त्याला." तावतावने एक मध्यम वयाची स्त्री ओरडत होती. तिचा ह्या विचारण्याने आम्हा सर्वांच लक्ष त्याच्याकडे गेल, तो मुलगा पायावर पाय टाकून निवांत मोबाईल मधले फोटो पाहत बसला होता. त्याला त्या बोलण्याच सोयरसुतक नव्हतं. त्या स्त्रीच्या ओरडण्याने बर्याच लोकांच्या कंठातून आवाज फुटू लागला. "ए कोण आहे रे? उठ कि" एकच गलबलाट सुरु झाला. एक विशेष गोष्ट म्हणजे त्या स्त्रीमुळे सर्व स्त्रिया जोरजोरात ओरडू लागल्या "त्याला काही अक्कल आहे कि नाही?, ज्याला देशाच्या राष्ट्रगीताची किंमत नाही, त्याला या देशात राहायचा अधिकार नाही". या असल्या आवाजामुळे तो मुलगा गुर्मिमध्ये "क्या है? क्या है?" म्हणू लागला. पुन्हा ती स्त्री म्हणाली "मराठी फिल्म पाहायला आलाय ना? मराठी कळतच असेल, राष्ट्रगीत चालू असताना उठून उभ राहव हि साधी गोष्ट कळत नाही?". हे सर्व काही इतक वेगान घडत होत त्यामुळे आम्ही सर्वजण आमच्या जागेवर उभेच होतो. मग मात्र या सर्व शेरेबाजींमुळे पूर्ण थियटर भर गोंधळ सुरु झाला. थियटरमधले कामगार पळत पळत आत आले. "क्या हुआ? क्या हुआ?" म्हणून विचारू लागले. एका सुरात सर्वजण ओरडले "त्याला पहिलं बाहेर काढा". तो मुलगा घाबरला आणि उठून "सॉरी सॉरी" म्हणून विनवू लागला. पण लोक मात्र त्याच्या वागण्याने भलतेच खवळले होते. यामध्ये आघाडी होती स्त्रियांची, त्या जोरजोराने त्याला नावे ठेवत होत्या. मग एकजण मोठ्याने ओरडला "याचे पैसे आम्ही देतो, पण याला हाकला नाहीतर शो सुरु होऊ देणार नाही" त्याच्यामागे सर्वंजण "हो आम्ही देतो " ओरडलो. मग काय त्या मुलाची पुरती गाळण उडाली. तो खूपच घाबरला त्याला काय करावे सुचेना. त्या कामगारांनी प्रेक्षकांना समजावयाचा प्रयत्न केला पण मामला हाताबाहेर गेला होता, शेवटी या गोंधळामुळे त्या मुलाला थियटर सोडावच लागलं. आणि सिनेमा सुरु झाला.

आता या प्रसंगातून खूप काही निष्कर्ष काढता येतील आणि लोक आपआपल्यापरीन काढतीलही. मला यापूर्वी राष्ट्रगीताचा अपमान करणारे खूप दिसले पण त्यांना बोलताना बर्याचदा लोकांची साथ मिळाली नाही. त्या दिवशीचा नूर मात्र काही औरच होता. सर्वात महत्वाच म्हणजे स्त्रियांनी आणि युवकांनी घेतलेला पुढाकार! मला त्या प्रश्न विचारणाऱ्या स्त्रीचं कौतुक कारावस वाटत, तिच्यामुळ संपूर्ण थियटरला हा सर्वप्रकार कळाला आणि विशेष म्हणजे तिच्या बोलण्याने त्याच गांभीर्य लक्षात आलं.

एक मात्र नक्की! त्या मुलाला आयुष्यभराचा धडा मिळाला.


---- शैनाथ कळमकर
(All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online  ,must be shared in totality.)

Comments

Sanjay Mohite said…
ashya lokana dhada shikavlach pahije
Rashtrgeeracha yogy maan raakhta yet nasel tar deshat rahanyacha adhikar asha lokanna nahi....rashtrageetala ubhe rahun maan dene he aichhik nasun kartavyacha bhaag aahe

Popular posts from this blog

मला आवडलेला चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो (Dr. Prakash Baba Amte- The real Hero)

दादा कोंडके - "एकटा जीव" पुस्तकानुभव

"घेई छंद" पुस्तकानुभव